शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:42 IST

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे.

ठळक मुद्दे या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.

- दादाराव गायकवाड  वाशिम: गत तीन वर्षांत राज्यातील गावे दुष्काळमूक्त करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविल्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे. या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.सातत्याने पडणाºया दुष्काळाला तोंड देण्यासाठी लोकसहभागातुन जलसंधारणाचे काम करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन मागच्या तीन वर्षात करण्यात आले होते. या स्पर्धेच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याबाबत जनजागृती झाली होती; मात्र जल बचतीचे महत्व, वृक्षारोपण, मृदा संधारण, शेतकºयांचा आर्थिकस्तर या बाबतीत काम करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच पाणी फाऊंडेशनच्यावतीने आता ‘समृद्ध गांव स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यात राज्यातील ४० तालुक्यातील हजारो गावांची निवडही करण्यात आली असून, सहभागी गावांनी समृध्द गांव स्पर्धेत उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन पानी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणारशेतकºयांना फळबाग लागवड, पीक पध्दती, जलसिंचन, शेती पुरक व्यवसाय, पशुपालन यासाठी सामुहिक प्रशिक्षण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, तसेच गाव शिवारातील पाळीव पशुसाठी गवताची सोय नसल्याने जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.   वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने शेतकºयांचा विकास साधण्यासाठी ‘समृद्ध गाव स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा लवकरच पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आणि सिने अभिनेता आमिर खान करणार असून, त्याचवेळी स्पर्धेचा कालावधीही निश्चित होणार आहे.-रविंद्र लोखंडेकारंजा तालुका समन्वयकसमृद्ध गाव स्पर्धा (पाणी फाऊंडेशन)

 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा