शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम!

By admin | Updated: May 23, 2017 17:52 IST

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. 

वाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रशासनाने चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्या असून नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद रोकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वाशिम जिल्ह्यातही उत्स्फूर्त स्वागत झाले. जवळ असलेल्या तद्वतच बंद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करताना आणि जमा केलेला पैसा बँकेतून ह्यविड्रॉलह्ण करताना होणारा त्रास मुकाटपणे सहन करित आज ना उद्या परिस्थिती पुर्वपदावर येण्याची आशा नागरिकांना होती. मात्र, विस्कळित झालेली आर्थिक आजही निवळलेली नाही. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेलाच पुरेशा प्रमाणात चलन मिळत नसल्याने खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना पैसा पुरविणे स्टेट बँकेला अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चलनअभावी जिल्ह्यातील सर्वच एटीएम अघोषित स्वरूपात बंद राहत आहेत. बँकांमध्येही नागरिकांना अपेक्षित रकमेचा विड्रॉल मिळत नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजही बहुतांशी ठप्प आहेत. एकूणच नोटाबंदीचा निर्णय जाहीर व्हायला सात महिने उलटल्यानंतरही त्याची झळ आजही सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोसावी लागत असल्याचे दिसून येत आहे.