शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चावडी वाचनातून निवडणुकीची गावे बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:09 IST

वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्ज पडताळणी प्रक्रिया गावपातळीवर पथक नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी  योजनेंतर्गत  शेतकर्‍यांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी  ते पात्र आहेत किंवा नाही, तसेच कोणी वंचित राहिले काय,  याची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर ‘चावडी वाचन’  प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, ज्या ग्रामपंचायतींची  निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमधील गावांत ही  प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हा  प्रशासनाकडून मंगळवारी प्राप्त   झाली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत  राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून दीड लाख रुपयां पर्यंतची कर्जमाफी, तसेच  २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर  अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ  घेण्यासाठी २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्या तील २.३७ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली; परंतु  त्यामधील केवळ १.२८ लाख शेतकर्‍यांचेच अर्ज ‘अपलोड’  झाले, तर कर्जमाफी प्रक्रियेतील अटी व शर्तींमध्ये बसू न  शकल्यामुळेच अखेरच्या टप्प्यात सुमारे १ लाख शेतकर्‍यांचे  अर्ज बाद ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली  आहे. आता ज्या शेतकर्‍यांचे अर्ज अपलोड झाले आहेत, ते सर्व  शासनाच्या निकषानुसार पात्र आहेत की नाहीत, तसेच काही  पात्र शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहिले आहेत  काय, याची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने चावडी  वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदारांच्या  मार्गदर्शनात गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि  गटसचिवाचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात येणार  आहे. हे पथक गावात ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये शे तकर्‍यांना कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणार्‍या शेतकर्‍यांची  यादी वाचून दाखवित. त्यांच्याकडून आक्षेप नोंदवून घेणार आहे.  यामध्येच कर्जमाफीसाठी कोणी अपात्र आहे काय, याची पड ताळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींची निवडणूक येत्या ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या कक्षेत येणार्‍या गावांत, ही प्रक्रिया  राबविली जाणार नाही. निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले  असून, केवळ निवडणूक नसलेल्या गावांतच ही चावडी वाचन  प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी  मंगळवारी दिली. 

अशी असेल चावडी वाचन प्रक्रिया चावडी वाचनात गावातून आलेल्या अर्जांची यादी एका  संचिकेमध्ये लावण्यासह या यादीतील अर्जदार योजनेस पात्र  आहेत की नाही, त्याची पडताळणी होईल, तसेच संबंधित  अर्जदारांनी इतर बँकेसोबतच त्या गावातील विविध कार्यकारी  संस्थेकडून कर्ज घेतले आहे काय, याची खातरजमा संबंधित  संस्थेकडून केली जाईल व त्याप्रमाणे अर्जदाराच्या यादीत  उल्लेख नसल्यास अशा अर्जदाराच्या नावासमोर त्यांचे संस् थेकडील कर्ज खाते क्रमांक व थकीत रक्कम नमूद करण्यात  येईल. गावपातळीवरील माहितीच्या आधारे यादीत संबंधित  अर्जदाराच्या नावासमोर वस्तुस्थिती दर्शविणारे शेरे नमूद  करण्यासह पात्र, अपात्रतेसंबंधित उपलब्ध पुराव्यांची प्रत त्या  संचिकेमध्ये लावण्यात येईल आणि तो पुरावा या संचिकेमध्ये  कोणत्या पानावर आहे, याचा उल्लेख अर्जदाराच्या  नावासमोरील रकान्यात करण्यात येईल.