शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीनंतर आढळतेय सोयाबीनमध्ये भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर ...

इंझोरी: सततच्या पावसासह विविध नैसर्गिक आपत्तीने सोयाबीनचे पीक संकटात असतानाच आता या पिकाच्या बियाण्यांतही भेसळ असल्याचे शेंगा परिपक्व झाल्यानंतर केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, या संदर्भात तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे पथक, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणीही केली. त्यातही या पिकात भेसळयुक्त झाडे आढळून आली आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी यंदा विविध नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवर्षण आदिमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता सोयाबीनच्या बियाण्यांत भेसळ असल्याचे झाडांच्या पाहणीतून शेतकऱ्यांना आढळून आले आहे. इंझोरी येथील शेतकऱ्यांनी कारंजा येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या नामांकित कंपनीच्या बियाण्यांची यंदा पेरणी केली होती. त्यात भेसळ दिसल्याने इंझोरीतील शेतकरी गोपाल बळीराम पायघन, गणेश हळदे, संतोष काळेकर, गजानन ढोक आणि डिंगाबर राऊत या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के, सत्यकाम मकासरे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली. त्या पाहणीनुसार सोयाबीन पिकात ७५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले आहे.

--------------

२४ एकरात आढळून आला प्रकार

इंझोरी येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे चांगले उगवले, परंतु आता या पिकाला लागलेल्या शेंगा आणि झाडांचे प्रकार वेगळे दिसत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली, या तक्रारीनुसार पथकाने पाहणी केली असता २४ एकरात हा प्रकार आढळला आहे.

-------------

७५ टक्के भेसळयुक्त झाडे

इंझोरीतील पाच शेतकऱ्यांनी मूळ ज्या सोयाबीन वाणाचे बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली. त्या वाणाऐवजी इतर सोयाबीन वाणाची ७५ टक्के झाडे त्यांच्या शेतात उगवल्याचे कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना आढळून आली आहेत.

०००००००००००००

कोट: यंदा कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून चार एकरात पेरणी केली. आता शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याची नुकसान भरपाई मिळावी.

-गोपाल पायघन,

शेतकरी, इंझाेरी

०००००००००००००

कोट: कारंजातील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून सहा एकरात पेरणी केली. हे बियाणे चांगले उगवले, परंतु शेंगा परिपक्व झाल्यानंतर निरीक्षण केले असता. त्यात भेसळयुक्त झाडे आढळले. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.

-गजानन ढोक,

शेतकरी, इंझाेरी