शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजार समितीवर प्रशासक

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

वाशिम जिल्हा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला.

वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर १२ सप्टेंबरच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधकांनी नियमांच्या अधिन राहून प्रशासकाची नेमणूक केली आहे. जिल्हा उ पनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांची वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी नियुक्ती झाली आहे. यासंदर्भात अधिक माहितीनुसार वाशिम बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ १६ जुलै २0१३ रोजी संपला होता. ८ फेब्रुवारी २0१३ च्या शासकीय अधिसुचनेनुसार सहा महिने बाजार समितीच्या निवडणूका पुढे ढकलण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानंतर शासनाने पुन्हा संचालक मंडळाच्या निवडणूकिस ७ मार्च २0१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शासन आदेशान्वये देण्यात आलेली मुदतवाढही संपली होती. पत्रानुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात शासनाचे मुदतवाढीबाबत रिट याचीका दाखल झालेली आहे.सोबतच शासन आदेशास अंतरिम स्थगिती दि. २३ जुलै २0१४ च्या आदेशानुसार दिली असुन प्रकरण अंतिम सुनावणीकरिता प्रलंबीत आहे. त्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ५९ नुसार संचालक मंडळास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. परंतू त्या प्रस्तावाच्या संबंधाने आजपर्यंत शासनाकडून कोण त्याही प्रकारचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ अ (१), (ब) नुसार प्रशासकाची नियुक्ती करणे अनिवार्य झाले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी १२ सप्टेंबर २0१४ रोजी आदेश निर्गमित करुन वाशिम कृषी उत् पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाची सुत्रे स्वत:कडे घेतली आहेत. या आदेशात ८ सप्टेंबरपासून बाजार समितीच्या सर्व समिती सदस्यत्वाचे सदस्यत्व पद धारण करण्याचे बंद होईल असेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे. कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ अ (४) प्रमाणे प्रशासकास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पुर्वमान्यतेने परिश्रमीक घेण्याचा अधिकार असल्याचेही जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.