शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय अनास्था, रस्त्याची झाली दैनावस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जाणाऱ्या बिबखेडपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे उद्भवलेल्या या प्रश्नाने ग्रामस्थ वैतागले ...

वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जाणाऱ्या बिबखेडपर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे उद्भवलेल्या या प्रश्नाने ग्रामस्थ वैतागले आहेत. याप्रकरणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा अंगीकारला असून २४ सप्टेंबर रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडण्यात आली.

रिसोडवरून मालेगावकडे जाणारा रस्ता बिबखेड गावापर्यंत मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तालुक्याला जोडलेल्या सुमारे ५० गावांमधील नागरिक या रस्त्याने नियमित ये-जा करतात. तसेच अकोला, मालेगाव जाण्यासाठी रिसोडवरून हाच एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. मालेगावपासून रिसोडपर्यंतच्या रस्त्याचे ९० टक्के काम सध्या पूर्ण झाले. केवळ रिसोडला लागून असलेल्या बिबखेड गावापासून रिसोडपर्यंतचा अंदाजे तीन किलोमिटरचा रस्ता प्रलंबित राहिला आहे. नेमक्या याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून पायदळही चालता येणे अशक्य झाले आहे.

असे असताना समस्या निकाली काढण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून चालढकल करित असल्याचे विष्णूपंत भुतेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मोठमोठे खड्डे आणि त्यात साचत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता पूर्णत: बंद पडण्याच्या स्थितीत आला आहे. सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना रिसोड बाजारपेठेत माल नेता येणे यामुळे अशक्य होणार आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करून प्रश्न न सोडविल्यास येत्या गुरुवार, ३० सप्टेंबर रोजी ‘भूमिपुत्र’ रास्ता रोको आंदोलन करणार, असा इशाराही विष्णूपंत भुतेकर यांनी दिला.