शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणातील १५०० रुग्णांवर प्रशासनाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:05 IST

Corona Home aisolation patients सौम्य लक्षणे असणाऱ्या १५०० पेक्षा अधिक रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढ झालेली आहे. हा आकडा सध्या १४ हजारांवर पोहोचला असून, उपचार घेणारे रुग्ण दोन हजारांवर आहेत. दरम्यान, सौम्य लक्षणे असणाऱ्या १५०० पेक्षा अधिक रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून, नगर परिषद, ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. पुढील ८ महिन्यांत, ३१ डिसेंबर २०२० अखेर बाधितांचा एकूण आकडा ६ हजार ६६३ झाला. चालू वर्षी मात्र कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण अत्यंत वेगवान असून, नव्या वर्षातील ८४ दिवसांतच (२५ मार्चअखेर) ७ हजार ३३१ रुग्णांची भर पडून एकूण बाधितांचा आकडा १३ हजार ९९४ वर पोहोचला आहे. त्यापैकी ११ हजार ७९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर २५ मार्चअखेर २०२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ७५ टक्के अर्थात १५०० पेक्षा अधिक रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. तसेच उर्वरित रुग्णांवर शासकीय व खासगी डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटल, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.दरम्यान, गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर ‘वाॅच’ ठेवण्याची जबाबदारी शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय आशा, अंगणवाडी सेविकांनाही याकामी नियुक्त करण्यात आले आहे. ९ ते १४ दिवस गृह विलगीकरणातील व्यक्ती कोणाच्याही संपर्कात येऊ नये, त्यांनी ठरावीक काळात घराबाहेर पडून शहर, गावात फिरू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष परिश्रम घ्यावे लागत आहेत.

‘ॲक्टिव्ह’ कोरोना रुग्ण प्रथमच दोन हजारांवरजिल्ह्यात कोरोनाचे संकट उद्भवल्याला २६ मार्च रोजी ३५७ दिवस पूर्ण झाले. इतक्या दिवसांत प्रथमच ‘ॲक्टिव्ह’ रुग्णांचा आकडा सध्या दोन हजारांवर पोहोचला आहे. यामुळे कोविड हेल्थ केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हाॅस्पिटलमधील बेड्स हाऊसफुल्ल झाले असून, अनेक रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या