शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी ग्राम पंचायत कर्मचाºयांचे वेतन देण्याच्या प्रशासनाच्या सूचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:34 IST

 वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन अदा करावे, अशा सूचना जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी दिल्या.ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम प्रशासन आणि पंचायत प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायत कर वसुलीसह जन्म-मृत्यु नोंदी घेणे, दिवाबत्ती, पाणी पुरवठा,  ग्रामपंचायत स्वच्छता, स्वच्छ भारत अभियानासह विविध कामे ...

ठळक मुद्दे उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला आढावा

 

वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन अदा करावे, अशा सूचना जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सोमवारी दिल्या.

ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम प्रशासन आणि पंचायत प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायत कर वसुलीसह जन्म-मृत्यु नोंदी घेणे, दिवाबत्ती, पाणी पुरवठा,  ग्रामपंचायत स्वच्छता, स्वच्छ भारत अभियानासह विविध कामे पार पाडावी लागतात. या कर्मचाºयांना पाच हजारापासून ते साडेसात हजारापर्यंत वेतन मिळते. त्यापैकी ५० टक्के वेतन जिल्हा परिषदेक डून आणि ५० टक्के वेतन हे संबंधित ग्राम पंचायतकडून मिळते. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, अनेक ग्रामपंचायत कर्मचाºयांना ग्राम पंचायकडून ५० टक्के वेतन मिळालेले नाही. मालेगाव तालुक्यातील १२५ च्या वर ग्राम पंचायत कर्मचारी गत काही महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच स्थिती अन्य तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांची आहे. या पृष्ठभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी गटविकास अधिकाºयांना सूचना देत ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामसचिवांनी ग्रामपंचायत कर्मचाºयांची दिवाळी गोड व्हावी यासाठी वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशा सूचना माने यांनी दिल्या.