वाशिम : येथील संतोषी माता नगर मध्ये नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरूंद झाला होता. रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नगर पालिकेच्या पथकाने १८ व १९ नोव्हेंबर पक्के बांधकाम पाडून अतिक्रमण मोकळे केले. मात्र, विवेक साहु यांना ईमारत पाडण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला होता. दोन दिवस उलटुनही अतिक्रमण जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे. शहराच्या विकास आराखड्यामध्ये संतोषी माता नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, अभियंता विनय देशमुख यांचेसह कर्मचार्यांच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी रस्त्याचे मोजमाप करून पक्के व कच्चे दोन्ही प्रकारचे अतिक्रमण काढले. अतिक्रमण मोहीम सुरू असताना विवेक साहु यांच्या टोलेजंग ईमारतीवर नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आपला बुलडोजर चालविणार होते.मात्र, त्यामध्ये ईमारतीचे जास्त नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे अभियंता देशमुख यांनी साहु यांचे नुकसान न करता त्यांना अतिक्रमणामध्ये आलेला भाग काढून टाकण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला. मात्र, या कालावधी दरम्यान साहु हे केवळ नगर पािकला प्रशासनाला ह्यउल्लूह्ण बविण्यासाठी टाईम पास करीत असल्याची चर्चा संतोषी माता नगर मध्ये रंगत आहे. या इमारतीबाबत पालिका आता कोणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
‘त्या’ ईमारतीवर वाशिम पालिका प्रशासनाची मेहरबानी
By admin | Updated: November 23, 2014 00:20 IST