वाशिम : आगामी १९ ऑक्टोबर रोजी पार पडणार्या विधानसभा निवडणुकीच्या म तमोजणीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, तिन्ही म तदारसंघातील मतमोजणी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.रिसोड मतदारसंघाची मतमोजणी रिसोड पंचायत समि ती सभागृहात, वाशिमची मतमोजणी बस स्थानकासमोरील कोरेनेशन टेनिस हॉल म्हणजेच जुने ऑफिस क्लब येथे तर कारंजा मतदारसंघाची मतमोजणी कारंजातील शेतकरी निवास येथे होणार आहे. या सर्व केंद्रांवर प्रत्येकी १४ टेबलवर मतदानयंत्राद्वारे झालेले मतदान तर एका टेबलवर पोस्टाने झालेल्या मतदानाची मतमोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ५३ असे एकूण १५९ मतमोजणी अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे त, अशी माहिती जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिली. मतमोजणीला सकाळी ८ वा. पासून सुरुबात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान २५ फेर्या होण्याची शक्यता असून, दु पारी १२ वा. पयर्ंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणी जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे.*मतमोजणीठिकाणी पोलिस बंदोबस्त मतमोजणी केंद्राबाहेर विविध राजकीय पक्षांच्या सर्मथकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तीनही मतमोजणी केंद्राबाहेर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्ताची जबाबदारी तेथे नियुक्त करण्यात आलेल्या उपविभागीय पोलिस अधिकार्यांवर राहणार आहे. तसेच निवडणूक यंत्रणेचे दिलेले ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही म तमोजणी केंद्रावर प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश सर्व पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण!
By admin | Updated: October 19, 2014 00:36 IST