वाशिम, दि. २७-सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून त्यांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने बुधवार, २९ मार्चला जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व वाशिम तहसीलदार कार्यालयाच्यावतीने स्वागत लॉन्स येथे होणार्या या मेळाव्यात कर्जविषयक विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभारण्याची संधी आहे; मात्र त्याविषयी पुरेशी माहिती नसल्याने कर्ज प्रकरण सादर करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या याच अडचणींचे मेळाव्यात निराकरण करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
रोजगार उपलब्धीसाठी प्रशासनाचा पुढाकार!
By admin | Updated: March 28, 2017 01:24 IST