शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक परिसरात वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: May 3, 2016 02:06 IST

रेल्वे न्यायालयाच्या पथकाची वाशिम रेल्वे स्थानकावर कारवाई.

शिखरचंद बागरेचा / वाशिमस्थानिक रेल्वे स्टेशन प्लॅटफार्मवर रेल्वेगाडीच्या आगमनाप्रसंगी गर्दी करणार्‍या ऑटो चालक व फेरीवाले विक्रेत्यांवर रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश राहुल थोरात यांच्या पथकाने २ मे रोजी दंडात्मक कारवाई केली. एकूण ५२ वाहनधारकांकडून १0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाशिम रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मवर रेल्वेगाडीचे आगमनप्रसंगी अाँटोचालक व फेरीवाले विक्रेत्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाला मिळाल्यावरून सदरची कारवाई करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. २ मे रोजी सकाळी १0 वाजता अमरावती ते तिरुपती रेल्वे गाडीचे वाशिम रेल्वेस्थानकावर आगमन होताच भुसावळ रेल्वे विभागाचे न्यायाधीश राहुल थोरात व आरपीएफ निरीक्षक मीणा, तिकीट निरीक्षक राजू सैबेवार यांनी त्वरित रेल्वे स्थानकावर उतरुन प्लॅटफार्मवर गर्दी केलेल्या ऑटोचालकांना व किरकोळ वस्तूची विक्री करणार्‍या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी ऑटोचालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये, तर फेरीवाल्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये, असा दंड वसूल करण्यात आला. अचाकन धाडसत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये एकच गोंधळ उडाला. नियमांना धाब्यावर बसविणार्‍या तब्बल ५२ जणांवर ही कारवाई करण्यात आली. यापुढे ऑटोचालकांनी व फेरीवाल्यांनी प्लॅटफार्मवर थेट येऊ नये, अशी ताकीद देण्यात आली. याप्रसंगी एकाही ऑटोचालक व फेरीवाल्यांकडे प्लॅटफार्म तिकीट आढळून आले नाही. सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत आरपीएफ उपनिरीक्षक कांबळे, हवालदार संतोष घुगे, स्टेशन मास्तर यांच्यासह रेल्वेस्टेशनच्या कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश होता.