शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दारूभट्ट्यांवर कारवाई; ११ आरोपींवर गुन्हा!

By admin | Updated: April 28, 2017 01:42 IST

गावठी दारू विक्रेत्यांमध्ये दहशत : पोलिस प्रशासनाची धडक मोहीम

मानोरा : शहर व तालुक्यात विविध ठिकाणी बेकायदा दारूअड्डयांवर पोलिसांनी गुरूवार, २७ एप्रिल रोजी धाड टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला. तसेच ११ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदा गावठी दारु विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, २६ व गुरुवार, २७ एप्रिलला पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात बेकायदा गावठी दारु गाळणाऱ्या अड्डयांवर छापे मारले. शहरातील वडारपुऱ्यात अपर पोलीस अधीक्षक सपना गोरे यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी प्रविण गजानन जाधव, इंदिरा लक्ष्मण लगडे, संजय नरसू शिंदे, व टाले यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात सुमारे ५७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलिसांनी ग्राम अभईखेडा येथे छापा टाकला असता, १० लिटर गावठी दारु जप्त केली. आरोपी दत्ता भेलकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. विठोली येथे पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांनी छापा टाकून ५० लिटर गावठी दारु, ३०० लिटर सडवा असा ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला. यातील आरोपी सुरेश पारधी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. बिट जमादार रमेश बोडखे यांनी रोहणा व साखरखेडा येथे टाकलेल्या छाप्यात दोघांविरुद्ध कारवाई केली. साखरडोह येथील आरोपी उषा रामा वाघमारे हिच्याकडून ४० लिटर गावठी दारू जप्त केली; तर रोहणा येथील आरोपी अजाब अंबोरे याच्याकडून ५० लिटर दारू व ५० लिटर सडवा माल जप्त करण्यात आला. चौसाळा येथील बिटजमादार प्रकाश भगत यांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी रेशीबाई सुभाष जाधव हिच्याकडून ५ लिटर दारू जप्त केली.बिट जमादार सुभाष महाजन यांनी विठोली येथे दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आरोपी रेणूका राठोड हिच्याकडून ५० लिटर दारु, ५० लिटर सडवा व शेख रशिद शेख मेहबुब याच्याकडून ३० लिटर दारु, १०० लिटर सडवा असा माल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लाखो रुपयाचा माल जप्त करून ११ आरोपींविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे शहर तथा तालुक्यात अवैधरीत्या गावठी दारू गाळून विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.