शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्यूपंचर डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

वाशिम : राज्यात कोेरोना महामारीची भयावह परिस्थिती असताना या साथरोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर ...

वाशिम : राज्यात कोेरोना महामारीची भयावह परिस्थिती असताना या साथरोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पदभरतीच्या घोषणेनुसार अ‍ॅक्यूपंचर परिषदेकडून अधिकृत असलेल्या राज्यातील ॲक्यूपंचर पात्रता धारकांना रुग्णसेवा करण्यासाठी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी ९ मे रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे.

निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अ‍ॅक्यूपंचर चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनिमयन करून तिचा विकास करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक इतर विवक्षित बाबींच्या संबंधात तरतुदी करण्याकरिता अधिनियमाद्वारे महाराष्ट्र अ‍ॅक्यूपंचर परिषदेची स्थापना केली आहे. परिषद अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील व राज्याबाहेरील अ‍ॅक्यूपंचर व्यवसायाची नोंदणी प्रक्रिया परिषदेने राबविली असून, या प्रक्रियेमध्ये (७३४०) अ‍ॅक्यूपंचर व्यावसायिकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच या व्यावसायिकांना परिषदेकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी आपण केलेल्या आरोग्य पदभरतीच्या घोषणेनुसार पदभरतीमध्ये अ‍ॅक्यूपंचरच्या २० टक्के जागा आरक्षित करून त्यामध्ये अ‍ॅक्यूपंचर व्यावसायिकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. हिवाळे यांनी केली आहे.