शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावच्या धरणाने गाठला तळ!

By admin | Updated: May 22, 2017 01:19 IST

पाण्याची गळती : सिंचनासही अपुरे पडले पाणी!

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. : येथील लघु सिंचन प्रकल्पाने तळ गाठल्याने उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आसेगाव येथे साधारणत: ११ वर्षापूर्वी लघु सिंचन विभागाअंतर्गत आसेगाव बांध धरण निर्माण करण्यात आले होते. आजघडीला धरण कोरडेठण पडले आहे. या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली. २०१६ मध्ये धरण पूर्ण भरल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, दादर या पिकाचा पेरा केला होता. भुईमूग पीक ऐन मोसमात असताना, धरणातील जलसाठा कमी झाला. परिणामी, शेतकऱ्यांची तारांबळ झाली. पिकाला पाणी कमी पडल्याने उत्पादनात प्रचंड घट आली व येत आहे. या धरणाच्या भिंतीमधून पाणी गळती होत असल्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त पाणी वाहून जाऊन धरणामध्ये असणारा जलसाठा कमी झाले, असे मानले जात आहे. धरणातून पाणी गळती होणार नाही, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले असते तर आजरोजी धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. धरणाने तळ गाठल्याने आसेगाव परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सोबतच जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडाझुडपांमुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडूपे तोडणे अपेक्षीत आहे.आसेगाव येथील धरणाच्या गळतीचा प्रश्न गांभीर्याने घेवून हे धरण पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करण्याचे प्रयत्न केले जातील. यासह धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे-झुडूपे तोडण्याबाबतही कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. धरण नादुरूस्तीमुळे कुठलेही नुकसान होणार नाही, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. - जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम