शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘त्या’ आरोपीच्या पोलीस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:14 IST

मानोरा: पोहरादेवी येथील विवाहित महिलेला नोकरीचे आमीष  दाखवून यवतमाळ, पुणे येथे नेऊन सतत अत्याचार करणारा  आरोपी रुपेश राजकुमार संत (रा.पंढरपूर) याच्याकडून अ पहरण प्रकरणात वापरलेले स्कॉर्पियो वाहन व १ लाख ३३  हजार रुपयांचे सोने मानोरा पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, ११  ऑक्टोबरला त्यास न्यायालयात हजर केले असता, अधिक  चौकशीसाठी १६ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ  करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देचार चाकी वाहन जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: पोहरादेवी येथील विवाहित महिलेला नोकरीचे आमीष  दाखवून यवतमाळ, पुणे येथे नेऊन सतत अत्याचार करणारा  आरोपी रुपेश राजकुमार संत (रा.पंढरपूर) याच्याकडून अ पहरण प्रकरणात वापरलेले स्कॉर्पियो वाहन व १ लाख ३३  हजार रुपयांचे सोने मानोरा पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, ११  ऑक्टोबरला त्यास न्यायालयात हजर केले असता, अधिक  चौकशीसाठी १६ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ  करण्यात आली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, पोहरादेवी येथील महिलेशी  फेसबुक, व्हॉटसअँपच्या माध्यमातून मैत्री करून तथा वारंवार  संपर्क करून मैत्री वाढवली. तुला चांगल्या कंपनीत नोकरी  लावून देतो, असे आमीष दाखवून  आरोपी रुपेश संत याने सदर  विवाहित महिलेस यवतमाळ, पुणे येथे नेऊन वारंवार तिच्यावर  अत्याचार केले. छर्‍याच्या बंदुकीचा धाक दाखवून त्याने हा  प्रकार केला. महिलेच्या अंगावरील सोने काढून ते विकले.  दरम्यान, जवळचे पैसे संपताच महिलेच्या भावाला १ लाख रु पयांची मागणी आरोपीने केली होती. मागणीची पूर्तता न झाल्यास  जिवे मारण्याची धमकीदेखील त्याने दिली, असे पोलीस तपासात  निष्पन्न झाले आहे. पोहरादेवी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या  पतीने मानोरा पोलिसात दाखल केली होती. तक्रारीत घरातील  सोन्याचे दागिनेही दिसत नसल्याचे नमूद केले होते. तक्रार प्राप्त  होताच, पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे यांनी तपासाची सूत्रे  वेगाने फिरवत सोलापूर येथून आरोपीस अटक केली व पीडित  महिलेला अक्कलकोट येथून ताब्यात घेतले. फिर्यादी विवाहित  महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपीने यवतमाळ,  पुणे येथे बंदुकीचा धाक दाखवून आपणावर सतत अत्याचार  केले व अंगावरील सोने काढून विकले. याप्रकरणी न्यायालयाने  आधी आरोपी संत यास ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली होती. चौकशीदरम्यान आरोपीने अपहरण प्रकरणात वा परलेली स्कॉर्पियो गाडी, छर्‍याची बंदूक व दिग्रस (जि.यव तमाळ) येथील लक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे चार सोन्याच्या  बांगड्या (किंमत १,३३,६५0 रुपये) जप्त करण्यात आल्या.  या बांगड्या मित्राच्या मदतीने आरोपीने विकल्या होत्या. फेसबुक व व्हॉटसअँपच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात  ओढणार्‍या रुपेश संत याने याआधीही कित्येक महिलांना  अशाचप्रकारे फसविल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे.  प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक राहुल काटकाडे,  मदन पुणेवर, सुनील गोतरकर करीत आहेत.