वाशिम: बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील शे. शफी शे. शब्बीर यांना आपसी वाद मिटविण्यासाठी पत्नीसह सहा जणांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी १५ मार्चला रात्री गुन्हा दाखल केला असून, यामधे वाशिम जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) येथील शे. शफी शे. शब्बीर यांनी २७ डिसेंबर रोजी मंठा येथील शे. नसरीन शे. अहेमद हिच्यासोबत जानेफळ येथे विवाह केला होता. त्यानंतर शे. नसरीन हिच्या आई-वडिलांनी विरोध करून शे. शफी यांना २५ लाख रुपयांची मागणी शेख हनिफ शे. शरिफ यांच्यामार्फत रोशन खा पठाण यांच्याकडे फोनद्वारे केली. ही बाब खरी की खोटी, हे पाहण्यासाठी शे. शफी हे काही लोकांना घेऊन अंढेरा येथे आले. तेथे शे. हनिफ शे. शरिफ यांच्यासह शे. नसरीन व तिचे आई-वडील शे. शफीच्या गाडीत बसले. तेव्हा शफी यांनी पत्नीला २५ लाख रुपयांबद्दल विचारले असता, माझे नातेवाईक जे सांगतील ते करा, असे त्यांच्या पत्नीने सांगितले.
खंडणी प्रकरणात वाशिम जिल्ह्यातील आरोपी!
By admin | Updated: March 18, 2016 02:03 IST