वैभव अवचार याने तक्रारीत नमूद केले आहे की, कोठा येथे मनरेगाच्या कामांत भ्रष्टाचार झाला. त्याची तक्रार करण्यात आली होती. चौकशीअंती ४१ लाखांचा भ्रष्टाचार उघडकीस आला. त्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अवचार यांनी केली होती. मात्र, अद्याप फौजदारी करण्यात आली नाही. त्यामुळे वैभवने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून कारवाई करा, अन्यथा ९ एप्रिलपासून उपोषणास बसू, असा इशारा दिला होता. दरम्यान, २ एप्रिल रोजी रोजगार सेवक जगन्नाथ अवचार व पंढरी अवचार यांनी वैभवला घेरून उपोषणास बसू नको, अन्यथा तुझा काटा काढीन, अशी धमकी दिली व शिवीगाळ केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कलम ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला.
शिवीगाळप्रकरणी आरोपींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST