मंगरुळपीर : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी १८ रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पारवा येथील १५ वर्षीय मुलीने तक्रार दिली की, आरोपी नामदेव पिराजे आमले रा. आडद ता. उमरखेड याने १५ रोजी फिर्यादीस मोटारसायकलवर जबरदस्तीने पळवून नेऊन लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीवर कलम ३७६, ३६६ व लहान मुलांचा लैंगिक अत्याचार अधिनियम ३,४,१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पुढील तपास पीएसआय नारायण पांचाळ करीत आहेत.
बलात्कारप्रकरणी आरोपीस अटक
By admin | Updated: April 20, 2015 01:56 IST