शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लेखाविषयक कामकाजाचा खोळंबा!

By admin | Updated: March 17, 2017 02:47 IST

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन : प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेची मागणी

वाशिम, दि. १६- शासन स्तरावर प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील लेखासंवर्गीय कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे मात्र त्यांच्या अखत्यारित येणार्‍या सर्वच कामांचा खोळंबा झाला असून १७ मार्च रोजी होणार्‍या स्वउत्पन्न अंदाजपत्रक सभेलाही अनुपस्थित राहणार असल्याचे संबंधित कर्मचार्‍यांनी प्रशासनाला कळविले आहे. सहायक लेखा अधिकार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे ह्यग्रेड पेह्ण वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्‍यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्‍यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर व्हावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गटस्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गटस्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग - ३ ची परीक्षा दरवर्षी नियमित घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत लेखा कर्मचार्‍यांचे जॉब चार्ट तयार करणे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग-२ चे पद निर्माण करणे आदी मागण्या शासन स्तरावर करण्यात प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात १0 ते १४ मार्चदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारच्या लेखणी बंद आंदोलनात लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी होते.