शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकबुर्जीत उरला १.५ द.ल.घ.मी. पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:26 IST

शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देवर्षभराची गरज सात द.ल.घ.मी.ची जुमडा बॅरेजमधून पाणी घेण्याच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना आतापासूनच भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाची सरासरी टक्केवारी ५0 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. असे असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून, वाशिम शहर तथा परिसरात तर फारच कमी पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, अर्धाअधिक पावसाळा उलटूनही वाशिमला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी जलाशयात अपेक्षित पाणीसाठा होऊच शकला नाही. त्यामुळे आजमितीस या जलाशयात उणापुरा १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक असून, १0 दिवसाआड पाणीपुरवठा केला, तरी तो आगामी तीन महिने अर्थात डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन जुमडा बॅरेजमध्ये असलेला चार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पाइपलाइनद्वारे एकबुर्जी जलाशयात खेचून आणण्यासाठी विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाच कोटी रुपयांची मागणी नोंदविलेली आहे. नगर परिषद स्तरावरूनही विद्यमान नगराध्यक्ष अशोक हेडा, पाणीपुरवठा सभापती राहुल तुपसांडे यांचे यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत; मात्र ही बाब खर्चिक असण्यासोबतच वेळखाऊ असल्याने विद्यमान स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याशिवाय इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी दुष्काळसदृश परिस्थिती आणि एकबुर्जी जलाशयात शिल्लक असलेला नगण्य पाणीसाठा, या बाबी लक्षात घेऊन पाण्याचा अनावश्यक वापर तथा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले जात आहे. 

यंदा अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे एकबुर्जी जलाशयातील पाणी साठय़ाची स्थिती चिंताजनक झाली आहे. असे असले तरी त्यावर मात करण्याचे सर्वंकष प्रयत्न नगर परिषदेकडून सुरू असून, वेळप्रसंगी मृत जलसाठाही शहरवासीयांची तहान भागवू शकतो. जुमडा बॅरेजमधून पाणी मिळाल्यास सोयीचे होणार आहे.             - अशोक हेडा, नगराध्यक्ष, वाशिम

एकबुर्जीचा घटलेला जलसाठा आणि यंदाची दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने आतापासूनच १0 दिवसाआड पाणी पुरविले जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.               - राहुल तुपसांडे, पाणीपुरवठा सभापती, वाशिम