वाशिम : स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य पूरविण्याबाबतच्या लाभासाठी पारीत केलेल्या ठरावाची मुळ प्रत देणेसाठी ६00 रूपयाची लाच स्विकारताना जांभरूण भित्ते ग्रामपंचायतच्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. ही घटना १0 ऑक्टोबर रोजी घडली. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरीता ग्रामपंचायतने ठराव पारित केला होता. या ठरावाची प्रत वरच्या कार्यालयामध्ये दाखल करण्याकरीता तक्रारदाराच्या पत्नीला पाहिजे होती. या ठरावाची प्रत देण्यासाठी जांभरूण भिते ग्रामपंचायतचा शिपाई तुकाराम वामन लगड याने तक्रारदाराला ६00 रूपयाची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली. १0 ऑक्टोबर रोजी एसीबीचे पोलिस निरिक्षक ए.जी. रूईकर यांच्या पथकाने सापळा रचुन शिपाई लगड याला ६00 रूपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. लगड याला अटक करून त्याचेविरूध्द वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.
लाच स्विकारताना शिपाई चतुभरूज
By admin | Updated: October 11, 2014 01:11 IST