शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती द्या - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, प्रभारी नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी घरोघरी जावून लसीकरणास पात्र व्यक्तींना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. १ एप्रिल पासून ४५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. सध्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येत आहे. या व्यक्तींपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर दररोज किमान १०० व्यक्तींचे लसीकरण होईल, यासाठी नियोजन करावे. याकरिता तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे अधिनस्त कर्मचाऱ्यांना निर्देश द्यावेत. तसेच त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घ्यावा. कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून या मोहिमेत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत हयगय करणाऱ्यांवर नाईलाजाने कारवाई करण्याची वेळ येवू नये, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, ग्रामस्तरीय समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात लसीकरणाविषयी प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी. याकरिता सर्व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले सरपंच तसेच शहरी भागामध्ये संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांची मदत घेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोना लसीकरण मोहिमेची माहिती पोहचवावी.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडून लसीकरणासाठी करण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेचा आढावा घेतला. तसेच ही मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना केल्या.