शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या अनुपस्थितीचा फटका शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:22 IST

शिरपूर जैन : येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन तलाठ्यांपैकी बरेचदा एक तलाठी अनुपस्थित राहतात. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका शेतकºयांना बसत आहे

ठळक मुद्देपेरेपत्रक मिळणे कठीण नाफेड खरेदीसाठी नोंदणी रखडली

शिरपूर जैन : येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन तलाठ्यांपैकी बरेचदा एक तलाठी अनुपस्थित राहतात. त्यांच्या अनुपस्थितीचा फटका शेतकºयांना बसत आहे. तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे पेरेपत्रक मिळण्यास विलंब होत असून, नाफेडच्या खरेदीसाठी नोंदणी रखडली आहे. 

शिरपूर येथे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणी मंडळ अधिकारी घनशाम दलाल, तसेच जे. एन.साठे, अंभोरे व अंबुलकर  असे तीन तलाठी कार्यरत आहेत. येत्या काही दिवसांत नाफेड मार्फत उडिद, मुग आणि सोयाबीन या शेतमालाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित खरेददार संस्थेकडे शेतामालाची नोंदणी करायची असून, शेतकºयांना तलाठ्यांकडून पेरेपत्रक दाखला आवश्यक आहे; परंतु शिरपूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयात कर्मचाºयांची अनुपस्थिती राहत असल्याने शेतकºयांना त्याचा फटका बसत आहे. शुक्र वार १३ आॅक्टोंंबर रोजी या ठिकाणी मंडळ अधिकारी दलाल व तलाठी अंबुलकर हे दोघे वगळता इतर दोन तलाठी अनुपस्थित होते. त्यामुळे शिरपूर  भाग १ वगळता भाग २ व भाग ३ मधील शेतकºयांना पेरेपत्रक दाखला मिळू शकला नाही. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला. सदर कार्यालयात  भेट दिली असता तलाठी जे.एन.साठे हे ११ आॅक्टोंबर पासून कार्यालयात आलेच नसल्याचे, तर तलाठी पी.एस.अंभोरे हे ही १३ आॅक्टोंबर रोजी कार्याल्यात आले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, तहसीलदारांशी संपर्क साधून माहिती घेतली असता जे. एन. साठे हे ११ आॅक्टोंबरपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. 

 नाफेडकडे उडिदाची विक्री करण्यासाठी नोंदणी करावी लागत असून, यासाठी पेरेपत्रक गरजेचे होते; परंतु १३ आॅक्टोबर रोजी मंडळ अधिकारी कार्यालयात गेलो असता तेथे तलाठी जे. एन. साठे आणि पी. एस. अंभोरे उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्हाला अडचणीचा सामना करावा लागला.  -सुरेश येवले, शेतकरी शिरपूर