शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्त्या नसतानाही सत्यप्रत साक्षांकित करणे भोवणार !

By admin | Updated: July 20, 2016 02:02 IST

शिक्क्याचा दुरुपयोग; अहवाल सादर करण्याचे निर्देश.

वाशिम: नियुक्ती झालेली नसतानाही सत्यप्रत साक्षांकित करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकार्‍यांचा शिक्का व स्वाक्षरीचा सर्रास वापर केला जात असल्याचे ह्यलोकमतह्ण स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आणताच, महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम तहसीलदारांना दिले आहेत. साक्षांकित प्रती सत्यप्रत करणे यासह अन्य काही कामांचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकार्‍यांकडे सोपविण्यात येतात. तत्कालीन काँग्रेस-राकाँच्या सरकारच्या काळात असलेल्या १४१४ विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या सर्व नियुक्त्या जिल्हा प्रशासनाने ९ फेब्रुवारी २0१६ रोजी रद्द केल्या आहेत. विशेष कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांचे शिक्के प्रशासनाकडे जमा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. चार महिन्यानंतर विशेष कार्यकारी अधिकार्‍यांनी खरोखरच शासकीय शिक्के प्रशासनाकडे जमा केले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी ह्यलोकमतह्णने १५ जुलै रोजी वाशिम शहरातील काही झेरॉक्स सेंटरवर स्टिंग केले. काही झेरॉक्स सेंटरवर विशेष कार्यकारी अधिकार्‍यांचे शिक्के मारून सत्यप्रत साक्षांकित करून देत असल्याचे निदर्शनात आले होते. ह्यलोकमतह्णचे वृत्त प्रकाशित होताच, अपर जिल्हाधिकार्‍यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम तहसीलदारांना दिले आहेत.