शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहीद अमोलच्या पार्थिवच्या प्रतिक्षेत वाशिमात देशभक्तीची लहर; शहरात जागाेजागी श्रध्दांजलीसाठी नागरिक दाखल

By नंदकिशोर नारे | Updated: April 19, 2023 13:18 IST

अमोलचे पार्थिव  विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे आणण्यात आले.  

वाशिम : भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात वापरी यांग बुंग नाला इस्ट कामेंग येथे सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय जवानाला वीरमरण आले. अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे १९ एप्रिल रोजी सकाळी पाेहचण्याआधी वाशिम शहरामध्ये जागाेजागी डिजे लावून देशभक्ती गिताची लहर दिसून आली. यावेळी जागाेजागी श्रध्दांजली देण्यासाठी हजाराे नागरिक उपस्थित हाेते. दुपारी १ वाजेपर्यंत भरउन्हात अमाेलच्या पार्थिवाची नागरिक प्रतिक्षा करताना दिसून आलेत.

अमोलचे पार्थिव  विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे आणण्यात आले.  पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे रवाना करण्यात आले. वाशिम शहरात सकाळी ते पाेहचणार असल्याने वाशिम शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली हाेती. चाैकाचाैकामध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यामध्ये शहरातील नागरिकांसह विविध शाळेतील विद्यार्थी माेठया प्रमाणात उपस्थित हाेते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान