वाशिम : ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील केकतउमरा येथे १९ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने २२ जून रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच एका जणाविरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३५४, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. समाधान पट्टेबहादूर याने गावातील एका अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरात बोलावून तिचा विनयभंग केला, असे पीडित कुटुंबाच्या तक्रारीत नमूद आहे.
९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Updated: June 23, 2016 01:04 IST