शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव अडकला ‘लालफीतशाहीत’!

By admin | Updated: March 16, 2017 03:04 IST

बॅरेजेसमधील पाण्याचा उपयोग शून्य; शेतकरी हतबल.

वाशिम, दि. १५- तब्बल ७१६ कोटी रुपये खचरून जिल्ह्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी 'बॅरेजेस' उभारण्यात आले; मात्र बॅरेजेस परिसरात अद्याप विजेची प्रभावी सोय करण्यात आलेली नाही. यासंदर्भात महावितरणने शासनाकडे पाठविलेला ९६ करोड रुपयांचा प्रस्तावही लालफीतशाहीत अडकून असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोर्‍याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे केली जात आहेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना ह्यसुप्रमाह्ण प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊन त्यात मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, सिंचनाच्या बाबतीत ह्यमाईलस्टोनह्ण काम ठरू पाहणार्‍या ह्यबॅरेजेसह्णच्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकर्‍यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले आहे; मात्र सिंचनाकरिता लागणार्‍या विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजेसह्णची उपयोगिता शून्य ठरणार, ही देखील वस्तूस्थिती होय. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवत महावितरणने फेब्रुवारी २0१६ मध्ये ह्यबॅरेजेसह्णस्थळी पुरेसा वीजपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन करून ९६ करोड रुपये खर्चाचा सविस्तर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला. त्यानुसार, गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे ३ वीज उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यावर ५ ह्यएमव्हीएह्णचे ६ ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे ५ ह्यएमव्हीएह्णचे २ अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्‍या उपकेंद्रापर्यंंत वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत लाइन टाकण्यासह इतरही बरीच कामे केली जाणार आहेत. शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा सलग पाठपुरावा सुरू असून, मार्च उलटल्यानंतर हा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळाले आहेत.- डी.आर.बनसोडेअधीक्षक अभियंता महावितरण, वाशिम.