लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : घरावरचे टिन सरकवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांत १ जुलै रोजी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी संजय देशमुख यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.
८७ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Updated: July 2, 2017 08:55 IST