शिरपूर जैन (वाशिम) : रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील गणेश नामदेवराव जुनघरे यांच्या घरातून २२ सप्टेंबर रोजी भरदिवसा ७0 हजाराच्या सोने दागिण्यांसह ७७ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम अंचळ येथील गणेश जुनघरे हे २२ सप्टेंबर रोजी आपले घर बंद करुन बाहेर गेले होते. ते सायंकाळी ६ वाजता घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप व कोंडा तुटलेला दिसून आला. याप्रकरणी जुनघरे यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
७७ हजारांची चोरी
By admin | Updated: September 25, 2014 01:30 IST