शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध विक्री होणारी ७६ हजार रुपयांची दारू जप्त!

By admin | Updated: May 14, 2017 02:18 IST

दोन आरोपींवर गुन्हे दाखल; वाशिम शहर पोलिसांची कारवाई.

वाशिम : शहरातील किरकोळ देशी व विदेशी दुकानदारांकडून खरेदी केलेली दारू बेकायदेशीररीत्या ग्राहकांना विकण्याचा गोरखधंदा करणार्‍या दोन आरोपींना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. या दोघांकडून देशी, विदेशी दारू, बिअरच्या बॉटल्स व दोन मोटरसायकली जप्त करून दोघांवरही १३ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५00 मीटर आतील दारू विक्रीची दुकाने बंद केल्यामुळे तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या तळीरामांची व्यवस्था करण्यासाठी अवैध मार्गाने दारू विक्रेत्यांची साखळी तयार झाल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार मोरे यांचे मार्गदर्शनात डिटेक्शन ब्रँचचे पोलीस कर्मचारी राजेश बायस्कर, मनोहर अष्टोनकर, सतीश गुडदे, ज्ञानदेव म्हात्रे, गजानन कराळे यांचा समावेश असलेल्या पथकाने गस्ती दरम्यान दोन वाहनचालकांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये संदीप मोहन जगदाळे (रा. कानरखेडा ता. सेनगाव जि. हिंगोली )व मंगश वसंता कंकाळ (रा. अल्लडा प्लॉट, वाशिम) यांचा समावेश आहे. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल, देशी, विदेशी दारू असा एकूण ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली. या दोघांविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.परवानाधारक किरकोळ विक्रेत्यांनी ठोक दारू विक्री करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. जप्त केलेल्या दारूच्या बॉटल्सवरील बॅच नंबरची दारू कोणत्या दुकानदाराकडे होती, याचा शोध घेऊन त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दारू वाहतूकदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुख्य दारू विक्रेत्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने आम्ही निश्‍चितच कारवाई करणार आहोत. - संतोष मोरे, ठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन