वाशिम : जिल्हय़ातून यंदा हज यात्रेकरिता सोडत पद्धतीने ७६ हज यात्रेकरूंची निवड झाली असल्याची माहिती दारव्हा येथील महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य हाजी सै. फारूक यांनी दिली.यंदा हज यात्रेकरिता ९५00 जणांनी आवेदनपत्र भरले होते. हज यात्रेकरिता २५ मार्च रोजी सोडत पद्धतीने ७३00 यात्रेकरूंची हज यात्रेकरिता जाण्यासाठी निवड झाली आहे. यापैकी वाशिम जिल्हय़ातून ७६ जणांची निवड झाली आहे.
हज यात्रेसाठी ७६ यात्रेकरूंची निवड
By admin | Updated: March 27, 2015 01:35 IST