शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरणसाठी मिळणार ७५ हजाराचे अनुदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:00 IST

शेतकºयांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कृषी विभागअनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकºयांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तरीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकºयांनी आपले अर्ज १६ नोव्हेंबर २०१७ अखेर शासनाच्या  संकेतस्थळावरून आॅनलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले.

शेततळ्यासाठी वापरायची फिल्म ही शासनाच्या निकषानुसार असणे आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १२० भौतिक व ९० लाख रुपये आर्थिक उद्दिष्ट मिळाले आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांना २० भौतिक व १५ लाख रुपये आर्थिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. तालुक्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाल्यास २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकºयांनी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.

टॅग्स :agricultureशेती