शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

७० टक्के पेरणी पूर्ण!

By admin | Updated: July 1, 2017 01:05 IST

सोयाबीनची सर्वाधिक पेरणी : सर्वात कमी कपाशीची लागवड!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जून महिन्यात सातत्यपूर्ण, समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाची ७० टक्के पेरणी आटोपली आहे. अपेक्षित उत्पादनासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला; मात्र त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. २८ जूनपर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. यावर्षी कृषी विभागाने एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. २८ जूनपर्यंत ८६ हजार ६९१ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७० अशी आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची दोन लाख २५३ हेक्टरवर झाली तर सर्वात कमी लागवड कपाशीची ९ हजार ३३१ हेक्टरवर झाली आहे. मुगाची पेरणी ११ हजार ४३९ हेक्टर, उडीद १५ हजार ३६९ हेक्टर, तूर ४४ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वाशिम तालुक्यात ८३ हजार २६० पैकी ५८ हजार ५३४ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७०.३० अशी येते. मानोरा तालुक्यात ५५ हजार २०२ पैकी ३२ हजार ११४ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ५८.१७ अशी येते. रिसोड तालुक्यात ७६ हजार १०० पैकी ५९ हजार १८१ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७७.७६ अशी येते. मंगरूळपीर तालुक्यात ५७ हजार ३९८ पैकी ५३ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ९३.१० अशी येते. मालेगाव तालुक्यात ६९ हजार ६३४ पैकी ५९ हजार ५४० हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ८५.५० अशी येते. कारंजा तालुक्यात ६७ हजार ४६९ पैकी २३ हजार ८७९ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ३५.३९ अशी येते.