शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयार केले ६९ ‘रिचार्ज पीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या ...

वाशिम : पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊ न देता शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवून जमिनीत मुरविण्यासाठी ६९ शेतकऱ्यांनी यंदा त्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार केले आहेत. वाशिम तालुक्यातील नागठाणा, श्रीगिरी येथील शेतकरी याकामी सरसावले असून, त्यांना भूजल सर्वेक्षण, कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.

देशभरातील मागास जिल्ह्यांच्या यादीत वाशिमचा समावेश आहे. दरम्यान, निती आयोगाकडून जिल्ह्यात विविध स्वरूपातील विकासात्मक कामे प्रस्तावित असून, पाणीपातळी खालावलेल्या पाणलोट क्षेत्रात ‘रिचार्ज पीट’ची कामे करण्याचेही नियोजन या माध्यमातून करण्यात आले. त्यास निती आयोगाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यानुसार, गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले होते. त्याची पाहणी स्वत: जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी करून समाधान व्यक्त केले होते. ‘रिचार्ज पीट’मुळे भर उन्हाळ्यातही संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दमदार राहिली. त्यामुळे त्यांना बारमाही पिकांपासून उत्पन्न घेता येणे शक्य झाले.

दरम्यान, गतवर्षी ‘रिचार्ज पीट’साठी पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन यावर्षी लघु पाणलोट क्षेत्र असलेल्या वाशिम तालुक्यातील नागठाणा आणि श्रीगिरी या गावशिवारातील शेतकऱ्यांनी ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकट काळातही भूजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक अतुल सुरसे, कृषी विभागाचे भागवत देशमुख आणि जलसंधारणचे अभियंता शुभम गिरी यांनी क्षेत्रीय तपासणीची कामे वेळेत पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ‘रिचार्ज पीट’ची कामे पूर्ण होऊ शकली, असा सूर संबंधित शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

........................

बाॅक्स :

१५० ठिकाणी ‘रिचार्ज पीट’ तयार करण्याचे उद्दिष्ट

गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर १० शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरणे शक्य झाले. यंदा आतापर्यंत ६९ शेतकऱ्यांच्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार झाले असून, एकूण १५० ठिकाणी ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

................

कोट :

पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरविण्यासाठी ‘रिचार्ज पीट’चा पर्याय सक्षम ठरला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी जलसंधारण विभागाचे अधिकारी दी. शा. प्रक्षाळे, मापारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांचे विशेष सहकार्य लाभले. शेतकऱ्यांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन स्वत:च्या शेतात ‘रिचार्ज पीट’ तयार करून घेतले.

- सुनील कडू

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, वाशिम