शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

६८0 शेततळ्यांची कामे झाली पूर्ण!

By admin | Updated: May 8, 2017 01:20 IST

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न

वाशिम : फेब्रूवारी २0१६ मध्ये शासनस्तरावरून मंजूर झालेली ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना तांत्रिक अडचणींमुळे मध्यंतरी थंडावली होती. मात्र, आता या योजनेला चांगलीच गती मिळाली असून ६८0 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १९00 पैकी उर्वरित १२२0 शेततळ्यांचे उद्दीष्ट अल्पावधीतच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली. मागेल त्याला शेततळे, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेततळे खोदण्याचे काम सद्या सुरू आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २0१६ या महिण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रारंभीच्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकर्‍यांना योजनेसंबंधीची पुरेशी माहितीच मिळाली नाही. यासह जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात बराच वेळ निघून गेला. पावसाळ्यामुळे तीन महिने कामेच होवू शकली नाहीत. परिणामी, नोव्हेंबर २0१६ अखेर योजनेंतर्गत ३२ शेततळ्यांची कामे पूर्ण होवू शकली होती. डिसेंबरमध्ये मात्र प्रशासनाने या योजनेला गती देवून ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली. डिसेंबर २0१६ ते मे २0१७ या कालावधीत योजनेने गती घेवून ६८0 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. उर्वरित १२२0 शेततळ्यांची कामेही येत्या काही महिण्यांत पूर्णत्वास जातील, असे गावसाने यांनी सांगितले.मागेल त्याला शेततळे या योजनेत जिल्ह्याला १९00 शेततळ्यांचे उद्दीष्ट मिळाले असून त्याच्या पुर्ततेसाठी कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, स्थळ निरीक्षण यासह इतरही किचकट बाबींवर मात करून कर्मचारी शेततळ्यांची कामे पूर्ण करित आहेत. - दत्तात्रेय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी