शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

तीन मध्यम प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा

By admin | Updated: September 21, 2015 00:09 IST

लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ ; मात्र चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता.

वाशिम : जिल्हयातील महत्वपूर्ण तीन मध्यम आणि १0४ लघु प्रकल्पांमधील जलसाठा पावसाळा संपत आला तरी वाढ झालेली दिसून येत नाही. जिल्हयात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने थोडा फार फरक पडला असून जिल्हयातील तीनही मध्यम प्रकल्पात जवळपास ६३ टकके जलसाठा आहे. चांगला पाऊस न झाल्यास पाणी टंचाईची शक्यता जाणवत आहे. सद्या जिल्हयातील या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठया प्रकल्पातील जलसाठा यावर्षी १00 टकक्यापर्यंत पोहचला नाही. आजच्या घडीला (२0 सप्टेंबरपर्यत) एकबुर्जी प्रकल्पात ६४.६६ टक्के, सोनल प्रकल्पात ५२.६0 टक्के तर अडाण प्रकल्पात ६७.५0 टक्के जलसाठा आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्हयाची तहान भागविण्याच्या दृष्टीकोणातून महत्वपूर्ण असलेल्या एकबुर्जी या प्रकल्पातील जलसाठयामध्ये वाढ होवू शकलेली नाही. यामुळे वाशिम शहरातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे. या प्रकल्पांमध्ये पाणी पातळी वाढविण्याच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठयाची झपाटयाने बाष्पीभवनामुळे घट होत आहे. १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने प्रकल्पातील जलसाठयात वाढ दिसून येत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याने अजून जोरदार पावसाची गरज आहे. येत्या काळात जिल्हयात दमदार पाऊस न पडल्यास पाणी टंचाईचे गडद सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने मात्र लघुप्रकल्पातील जलसाठयात वाढ झालेली दिसून येत आहे. यामध्ये अडगाव, गणेशपूर , कोकलगाव बोरव्हा, आसोला, खडकी, भिलडोंगर, हिवरा खुर्द, वाकद, रुई, गीद व फुलउमरी या प्रकलंचा समावेश आहे. हे प्रकल्प ९५ ते १00 टक्के भरली आहेत. ईतर लघु प्रकल्पांमध्येही थोडीफार वाढ दिसून येत आहे.

*पाऊस न झाल्यास पाणी, चारा टंचाईची शक्यता

       मृग नक्षत्रात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस बरसलयाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते. संपूर्ण पावसाळयात ५ ते ६ वेळा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवश्यावर जो साठा शिल्लक आहे त्यावरचं सर्व भागविल्या जात आहे. जोरदार पाऊस न आल्यास जिल्हयात तीव्र पाणी टंचाई व चाराटंचाईस सामोरे जाण्याची वेळ जिल्हावासियांवर येवू शकते.