शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

६३ टक्के शेतक-यांनी काढला विमा

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

विम्यापोटी १0.८२ कोटींचा भरणा ; १.४७ लाख हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच.

वाशिम : नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून खरीप पीक विमा योजनेकडे यावर्षी शेतकरी मोठय़ा संख्येने वळले आहेत. वाशिम जिल्हय़ात यावर्षी १ लाख ५१ हजार ८४४ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. त्यापोटी १0 कोटी ८२ लाख ३३ हजार ४४७ रुपयांचा हप्ता भरल्या गेला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील चार लाख २६ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी एक लाख ४७ हजार ७९८ हेक्टरवरील पिकाचा विमा प्रत्यक्षात काढला गेला आहे. जिल्हय़ातील दोन लाख ४२ हजार शेतकर्‍यांपैकी एक लाख ५२ हजार ४६0 शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात विमा काढला असून, त्याची टक्केवारी ६३ अशी येते.गतवर्षी जिल्हय़ातील ६0 टक्के शेतकर्‍यांनी विमा काढला होता. या पैकी ८१ टक्के शेतकर्‍यांना प्रत्यक्षात विम्याचा लाभ झाला. त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये विमा काढणार्‍या शेतकर्‍याचे ३ टक्केने वाढले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या योजनेत सहभाग घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ही ३ ते ५ टक्क्याच्या आत होती; मात्र गत दोन वर्षात शेतकर्‍यांना आलेला लहरी हवामानाचा अनुभव आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्हय़ात प्रामुख्याने ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, कापूस, कांदा, मका, भूईमूग, बाजरी, या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रत्येक पिकासाठी वेगळा हप्ता ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आत्महत्याग्रस्त वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि वर्धा या जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना पीकविम्याच्या हप्त्यात ५0 टक्के सूट दिल्या गेली आहे. त्याचाही शेतकर्‍यांना लाभ होत आहे.