शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६२ मुली बेपत्ता; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 15:03 IST

गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत वर्षभरात जिल्हयातील ६२ मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली असून, चालु महिन्यातही ४ मुली बेपत्ता झाल्या. यामधील एका मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गत १५ दिवसांत वाशिम जिल्ह्यात जवळपास चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनेच्या अनुषंगाने गत वर्षभरातील आढावा घेतला असता जवळपास ६२ मुली बेपत्ता झाल्या असून, यापैकी ४४ मुलींचा शोध लागला आहे. उर्वरीत १८ मुलींचा शोध अद्याप लागला नाही. या मुलींच्या बेपत्ता होण्यामागील निश्चित कारणे अद्याप समोर आली नाहीत. पिडीत मुलींचे अपहरण झाले की कुणी फूस लावून पळवून नेले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.विविध कारणांमुळे मुली, महिला बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गत वर्षातही मुली, महिला बेपत्ता होण्याची प्रकरणे घडली होती. सन २०२० च्या सुरूवातीलाच मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या. चार मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध अद्याप लागला नाही. एका बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अजून दोन मुली बेपत्ता झाल्याचे संदेश सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. परंतू, या घटनेची पोलीस दप्तरी कुठेलीही नोंद नाही. बेपत्ता मुलींचा शोध लावण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दोन बेपत्ता मुलींचा शोध लवकरच लागेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. पालकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे ठरत आहे.सोशल मीडीयापासून सावधगिरी बाळगणे गरजेचेअल्पवयीन मुला-मुलींमध्ये सध्या फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचे फॅड आहे. संवाद साधण्याचे सोपे व सहज माध्यम म्हणून फेसबुक, मेसेंजरचा सर्रास वापर होत आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मुलींची फसगत झाल्याचे प्रकारही वाशिमसह नजीकच्या अकोला, बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. या प्रकारापासून सावध होत मुला-मुलींनी सोशल मीडियाच्या वापरावर स्वत:हून नियंत्रण आणले तर संभाव्य फसगतीला आपसूकच आळा बसू शकेल, यात शंका नाही.सन २०२० मध्ये जानेवारी महिन्यात तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. एका मुलीचे लोकेशन मिळत नाही. दोन मुलींचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या तपासाला योग्य दिशा मिळत आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पालकांनीदेखील आपल्या पाल्यासंदर्भात सतर्क राहिले पाहिजे. अल्पवयीन मुला-मुलींना शक्यतोवर अँड्राईड मोबाईल देणे टाळले पाहिजे. आपल्या पाल्याचे कोण मित्र आहेत यावरही पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. आपले पाल्य कुणाशी भेटताहेत यावरही लक्ष असायला हवे. पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे, वेळोवेळी चेक करावे, शाळेला भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMissingबेपत्ता होणं