शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५६३७ बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन ...

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या फळपिकांनाही फटका बसला. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शासनाकडे २ कोटी १२ लाख ७३ हजार ८२६ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे पाच शेतकऱ्यांचे १.१० हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे, ३९४४ शेतकऱ्यांचे २२४३.५७ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले, तर १६८८ शेतकऱ्यांच्या ४८१.२५ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच खरडून गेल्या आहेत.

०००००००००००००००००००००००

पंचनाम्यास विलंबाचा परिणाम

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जुलैच्या मध्यंतरापर्यंतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली, परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही प्रशासनाला पंचनामे करण्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे अंतिम अहवाल तयार करून शासनाकडे मदतीची मागणी करण्यासही विलंब झाला.

०००००००००००००००००००००००

ऑगस्ट महिन्यात पाठविला प्रस्ताव

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले, तरी पंचनाम्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे प्रत्यक्ष ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या नुकसानाचे अंतिम अहवाल आपत्ती व्यवस्थापनास मिळण्यास विलंब झाला. तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.

०००००००००००००००००००००००

तीन तालुक्यांंत नुकसान

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका केवळ तीनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला. त्यात मंगरूळपीर तालुक्यातील ४,२६८, वाशिम तालुक्यातील २७, तर मानोरा तालुक्यातील १३४२ शेतकऱ्यांचे मिळून २७२५.९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, रिसोड आणि कारंजा या तीन तालुक्यांत मात्र निकषानुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही.

---------

नुकसानीचे पीकनिहाय क्षेत्र

पीक हेक्टर - क्षेत्र हेक्टर

सोयाबीन- १६२६.४९

तूर - ४०८.३३

कापूस - १६६.५५

मूग - ११

हळद - ०३

ज्वारी - १३

इतर जिरायत - १४.२०

फळपिके - १.१०

---------------------

खरडून गेलेले क्षेत्र - ४८१.२५ हेक्टर

०००००००००००००००००

कोट : जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर शासन निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणारा प्रस्ताव आयुक्तस्तरावर पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा केली जाईल.

-शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम