शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

५६३७ बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन ...

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या फळपिकांनाही फटका बसला. जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शासनाकडे २ कोटी १२ लाख ७३ हजार ८२६ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे पाच शेतकऱ्यांचे १.१० हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे, ३९४४ शेतकऱ्यांचे २२४३.५७ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले, तर १६८८ शेतक-यांच्या ४८१.२५ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच खरडून गेल्या आहेत.

०००००००००००००००००००००००

पंचनाम्यास विलंबाचा परिणाम

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जुलैच्या मध्यंतरापर्यंतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली, परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही प्रशासनाला पंचनामे करण्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे अंतिम अहवाल तयार करून शासनाकडे मदतीची मागणी करण्यासही विलंब झाला.

०००००००००००००००००००००००

ऑगस्ट महिन्यात पाठविला प्रस्ताव

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले, तरी पंचनाम्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे प्रत्यक्ष ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या नुकसानाचे अंतिम अहवाल आपत्ती व्यवस्थापनास मिळण्यास विलंब झाला. तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.

०००००००००००००००००००००००

तीन तालुक्यांंत नुकसान

जिल्ह्यात जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका केवळ तीनच तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला. त्यात मंगरूळपीर तालुक्यातील ४,२६८, वाशिम तालुक्यातील २७, तर मानोरा तालुक्यातील १३४२ शेतकऱ्यांचे मिळून २७२५.९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, रिसोड आणि कारंजा या तीन तालुक्यांत मात्र निकषानुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही.

---------