शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST

वाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा ‘डेंजर झोन’मध्येपिण्याचे पाणी राखून ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.वाशिमच्या एकबूर्जी जलाशयातून दरवर्षी परिसरातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील पिकांकरिता सिंचनासाठी पाणी सोडले जाते. यासह संपूर्ण वाशिम शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मात्र समाधानकारक पावसाअभावी एकबूर्जी प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. लघुपाटबंधारे विभागाने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील शिल्लक जलसाठय़ाच्या आकडेवारीमध्ये एकबुर्जीत आजरोजी केवळ १६.४६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने शहरात ८ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघू प्रकल्पांच्या जलाशय पातळीतही यंदा पावसाअभावी वाढ झालेली नाही. चालु आठवड्यात तीन ते चार दिवस पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ांवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १.१४ आणि २९.१४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. तसेच १२३ लघुप्रकल्पांमधील जलसाठय़ाची स्थितीही चिंताजनक आहे. सद्य:स्थितीत वाशिम तालुक्यातील ३२ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी ६.५५ टक्के जलसाठा शिल्लक असून तब्बल २१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. मालेगाव तालुक्यातील २१ प्रकल्पांपैकी ८, रिसोड १८ पैकी १0, मंगरुळपीर १५ पैकी ६, मानोरा येथील २३ पैकी ६ आणि कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पांपैकी ३ मध्ये आजमितीस शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाशिमसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असून यापुढे मोठा तथा संततधार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. दरम्यान, टंचाईसदृष परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा प्रशासन, नगर पालिका, ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे दिसून येत आहे. 

पाणीटंचाई निवारणार्थ २४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये असणार्‍या प्रकल्पांची पाणीपातळी खालावली असून पिण्याकरिता पाणी राखून ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. गुरूवार, २४ ऑगस्टला याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होत असून पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी प्रकल्पात यंदा अपेक्षित प्रमाणात पाणीसाठवण झालीच नाही. सद्या प्रकल्पात केवळ १६.४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने नगर परिषदेमार्फत नियोजनाच्या दृष्टीकोणातून ८ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनीही नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. - राहुल तुपसांडेपाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, वाशिम