शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

५२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पूर्ण

By admin | Updated: July 2, 2017 19:37 IST

वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ४ जूलैपासून हरकती व आक्षेप मागविले आहेत. पाच वर्षाचा कालावधी संपत आल्याने तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. प्रतिष्ठा जपण्यासाठी गावातील दिग्गज मंडळी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्व कसब पणाला लावते. निवडणुकीपूर्वी या ग्रामपंचायतींची वार्ड निश्चित करण्यासाठी तसेच आरक्षण सोडत काढण्यासाठी वाशिम तहसील कार्यालयाने २१ जून ते २४ जून या दरम्यान संबंधित गावांत ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.२१ जून रोजी अंजनखेड, चिखली खु., सापळी, सोनखास, खंडाळा खु., धानोरा बु., भटउमरा, पांडव उमरा, घोटा, राजगाव, हिस्से बोराळा, शिरपूटी, जवळा येथील ग्रामपंचायतींची वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. २२ जून रोजी सावळी, मोहजा रोड, सावरगाव बर्डे, कोंडाळा म., खरोळा, धानोरा खु., शेलगाव, बोरी बु., आसोला, गणेशपूर, वाघोली बु., वाई, चिखली बु. तर २३ जून रोजी कार्ली, सुराळा, गोंडेगाव, शेलु बु., जयपूर, नागठाणा, जुमडा, जांभरूण महाली, फाळेगाव थेट, देपूळ, सोंडा, सुकळी, धुमका तसेच २४ जून रोजी कृष्णा, ढिल्ली, जांभरूण प., हिवरा रोहिला, तांदळी शेवई, साखरा, सुपखेला, उमरा श., बाभूळगाव, उमरा कापसे, ब्राह्मणवाडा, कोकलगाव व टणका  येथील वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ४ ते ११ जुलै दरम्यान आक्षेप, हरकती मागविल्या आहेत. त्यानंतर वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत निश्चित केली जाणार आहे.