मंगरुळपीर (वाशिम): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंर्तगत स्थानीक तहसिल कार्यालया समोर २२ नोव्हेंबर रोजी मागेल त्याला काम मागणीचा मेळावा आयोजीत करण्यात आले होते.या मेळाव्यात ५00 मजुरांनी काम मागणी केली दरम्यान अमरावती रोहयोचे उपायुक्त ताकसाळे यांनी रोजगार नोंदनी मंडपाला भेट देवुन माहीती घेतलीकाम मागणी मेळाव्याचे उदघाटन कार्यक्रम अधिकारी तथा तहसिलदार बळवंत अरखराव यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे रोहयो विभागाचे नायब तहसिलदार सुनिल देशमुख,तसेच शाखा अभियंता काळे,एम.आय.समन्वयक गजानन अंभोरे,विशेष कार्यक्रम अधिकारी महादेव आडे आदी उ पस्थीत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अं र्तगत रोहयो उपायुक्त अमरावती यांच्या सुचने नुसार सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.काम मागणी मेळाव्या अंर्तगत तालुक्यातील जॉब कार्ड धारकांची कामाची मागणी,नविन मजुरांची नोंदनी रोजगार मागणी पत्रक नमुना क्रमांक ४ भरून देणे,बँक खाते उघडणे,व मजुर नोंदनी करणे आदी उपक्रम या मेळाव्यात राबविण्यात आले. मेळाव्यात ५00 मजुरांनी काम मागणी केली.दुपारी ३.३0 वाजताचे दरम्यान उपायुक्त ताकसाळे यांनी नोदंनी मंडपाला भेट देवुन उपक्रमात मजुरांच्या प्रतिसाद बाबत माहीती घेतली.
५00 मजूरांनी केली रोजगाराची मागणी
By admin | Updated: November 23, 2014 00:10 IST