शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST

इंझोरी : भिंतीला तडा गेल्याने मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील सिंचन तलाव हिवाळ्यातच कोरडा पडला आहे. त्यामुळे या तलावावर ...

इंझोरी : भिंतीला तडा गेल्याने मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील सिंचन तलाव हिवाळ्यातच कोरडा पडला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिके संकटात सापडली आहेत. लोकमतने २३ जानेवारी रोजी ‘जामदऱ्याचा सिंचन तलाव हिवाळ्यातच आटला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर इंझोरी जि.प. सर्कलच्या सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन विकास समितीकडून या तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे जवळपास २५ वर्षांपूर्वी जि.प. जलसंधारण विभागांतर्गत सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आणि परिसरात रब्बीचे क्षेत्रही वाढले. शेतकऱ्यांना २१ वर्षे मुबलक पाणी या तलावातून मिळाले; परंतु गेल्या चार वर्षांपूर्वी या तलावाच्या भिंतीला तडा गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून तलाव हिवाळ्यातच कोरडा पडू लागला आणि तलावाच्या भरवशावर पेरणी केलेली गहू, हरभरा पिके संकटात सापडू लागली. या प्रकारामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी या संदर्भात जि.प. जलसंधारण विभागाच्या मानोरा शाखेकडे निवेदन सादर करून दुरुस्तीची मागणीही वारंवार केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे यंदाही हिवाळ्यातच हा प्रकल्प आटला आणि या तलावाच्या भरवशावर पेरलेली शेकडो एकरातील रब्बी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. लोकमतने वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर इंझोरी सर्कलच्या जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडे ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे.

---------------------

जि.प. अध्यक्षांकडून प्रस्तावाला रेटा

जामदरा येथील सिंचन तलाव लिकेजमुळे आटत असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेत जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या तलावाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शविताना निधी मंजुरीसाठी रेटा लावण्याची तयारी केली आहे.