शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:24 IST

वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ४६ हजार ७२१ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे.  त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांची संख्या ३४ हजार ४३९, तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांची संख्या १२ हजार २८२ असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दिली.

ठळक मुद्देशेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसादकर्जदार शेतकर्‍यांचे प्रमाण अधिक६ कोटी ३0 लाख रुपयांचा भरणा!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ४६ हजार ७२१ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे.  त्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांची संख्या ३४ हजार ४३९, तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांची संख्या १२ हजार २८२ असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दिली.संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकर्‍याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विविध पिकांचा विमा काढला जातो. तथापि, वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या पिक विम्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. सर्वच राष्ट्रीयकृत बँकांद्वारे पीकविमा उतरविणया प्रक्रिया राबविण्यात येते. त्यातच पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना पीक विमा काढणे सक्तीचे असल्यामुळे यंदाही जिल्ह्यात पीकविमा काढणार्‍या शेतकर्‍यांचीच संख्या अधिक आहे. जिल्हा अग्रणी बँकेतून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३४ हजार ४३९ कर्जदार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, तर  बिगर कर्जदार शेतकर्‍यांपैकी १२ हजार २८२ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यानंतर शेतकर्‍याने नोंदविलेल्या संबंधित पिकाचा विमा निघतो. त्यानुसार, जिल्हाभरातील ४६ हजार  ७२१ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणार्‍यांची संख्या वाढली आहे.  

६ कोटी ३0 लाख रुपयांचा भरणा!वाशिम जिल्ह्यात विविध पिकांचा विमा काढणार्‍या ४६ हजार शेतकर्‍यांपैकी पीककर्ज काढलेल्या ३४ हजार ३४९ शेतकर्‍यांकडून विविध बँकांनी त्यांच्या पीककर्जाच्या रक मेतून पिकविम्यापोटी ४ कोटी ८७ लाखांची रक्कम कपात केली आहे. तथापि, बिगर कर्जदार शेतकर्‍यांकडून या योजनेला मुदतवाढीनंतर प्रतिसाद लाभल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण १२ हजार २८१ शेतकर्‍यांनी मिळून पीकविम्यापोटी विविध बँकांत १ कोटी ४३ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. संभाव्य पीक नुकसानीनंतर पीकविम्यासाठी असलेल्या निकषानुसार उपरोक्त सर्व शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे होणार्‍या नुकसानापासून त्यांना सुरक्षा मिळाली आहे.