शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांच्या ४00 जोडण्या रखडल्या!

By admin | Updated: December 4, 2015 02:47 IST

मालेगाव तालुक्यात धडक सिंचन योजनेचे १00 प्रस्ताव तयार.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम) : शेतकर्‍यांना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याचा डंका पिटणार्‍या महावितरण यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही मालेगाव तालुक्यातील ४00 शेतकर्‍यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नाही. गत काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलल्याने शेती उत्पादनात चढ-उतार येत आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत आहेत. शासकीय योजना आणि वैयक्तिक स्वरुपात शेतात विहिरी खोदून शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे. कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात कोटेशन भरून शेतकर्‍यांना प्रस्ताव सादर करावा लागतो. मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी प्रस् ताव सादर केलेले आहेत. ३0 नोव्हेंबरपर्यंंत ४00 कृषीपंप जोडण्या रखडलेल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणी असूनही शेतकर्‍यांना सिंचन करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यावर्षी मालेगाव तालुक्यावर पाऊस रुसला. त्यामुळे खरीप हंगामात शे तकर्‍यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. मेडशी, रिधोरा, किन्हीजा व अन्य काही भागातील शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मूग व उडदाचे उत्पादन निच्चांकी पातळीवर आले. सोयाबीनवर भिस्त अस ताना सोयाबीनच्या उत्पादनातही कमालिची घट आली. एकरी ८ ते १0 िक्ंवटल उत्पादनाऐवजी यावर्षी एक ते तीन क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा उतारा आला. त्यामुळे शेतकर्‍यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. ही कसर रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनातून भरून काढण्यासाठी शेतकरी सिंचनावर भर देत आहे; मात्र कृषीपंप जोडणी मिळण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने पाणी असूनही सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ ४00 शेतकर्‍यांवर आली. थकीत बिलापोटी वीजजोडणी कापणार्‍या वीज वितरण कंपनीने आपल्या क र्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्‍यांना अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्‍या अनेक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनीदेखील चुप्पी साधल्याने 'बेगडीपण' चव्हाट्यावर येत आहे.