कार्यक्रमास विमलानंद महाराज, आचार्य शिवदास शास्त्री, आमदार लखन मलिक, जि.प.चे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, नगराध्यक्ष अशोक हेडा, पवनकुमार वर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, संजय मापारी, मोतीराम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहील. देपूळ येथे दत्त मंदिर उभारले जावे, अशी इच्छा माधव गिरी महाराज यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार लोकसहभागातून जमा झालेल्या निधीतून गावात मंदिर बांधकाम करण्यात आले असून २२ ऑगस्ट रोजी दत्त व अनसूया माता मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
..................
रक्षाबंधनाच्या औचित्यावर महिलांचा सन्मान
देपूळ येथे २२ ऑगस्ट रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याचदिवशी रक्षाबंधन असल्याने गावातील ४०० लेकीबाळींना साडी-चाेळी देऊन सन्मानित केले जावे, अशी संकल्पना मांडण्यात आली. ती प्रत्यक्षात उतरत असून माधव गिरी महाराज यांच्या हस्ते गावातील महिलांना सन्मानित केले जाणार आहे.