शिरपूरजैन : येथे १९ जुलै रोजी संत ओंकारगिर बाबा यांच्या १८ व्या पुण्यतिथी सोहळा निमित्त भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटपाने पुण्यतिथि सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी जवळपास ४0 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
१२ जुलै पासून येथील सर्वधर्मीयांचे ङ्म्रध्दास्थान असलेल्या जानगीर महाराज संस्थानवर संत ओंकारगीर बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळयाचे आयोजन करण्यात आलेहोते. या सोहळयानिमित्त संस्थानवर ओंकार भक्ती विजयग्रंथाचे पारायण, सहस्त्रविष्णुहरिनाम, प्रवचन, व्याख्यान, दररोज नामवंत किर्तनकारांचे किर्तन असे मोठया प्रमाणात अध्यात्मीक कार्यक्रम घेण्यात आले. सतत सप्ताहभर सुरु असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजी जवळपास विदर्भ मराठवाडयातील ५0 भजनी दिंडया व हजारो बाबा भक्तांच्या सह जानगीर महाराज संस्थानवरुन संत ओंकारगिर बाबा यांची प्रतिमा लावलेल्या रथाची मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक परंपरेनूसार मुख्य रस्त्याने इरतकर वेटाळून मुस्लीम संत हजरत मिर्झा अमानुल्ला शाह यांच्या दग्र्यात नेण्यात आली. तेथे दग्र्याच्या वतीने तेथील पुजार्याने ओंकारगिर बाबा यांच्या प्रतिमेचे स्वागत व पूजन केले. पुढे जानगीर महाराज की जय व ओंकारगिर बाबा की जयचा गजर करीत मिरवणुक बसस्थानक परिसरातून जैन मंदिर मार्गाने दुपारी संस्थानकडे रवाना झाली. मिरवणुकीच्या वेळी जैन श्वेतांबर संस्थान तर्फे मिरवणुकीतील हजारो भक्तांना मिरवणुकीच्या वेळी अल्पोहार देण्यात आला. त्यानंतर संस्थानवर संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांनी महाप्रसादासाठी बनविण्यात आलेल्या बुंदी, पोळी, भाजी, पूजन कररुन महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जवळपास ४0 हजार बाबा भक्तांनी शिस्तीमध्ये रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. या पुण्यतिथी सोहळयाच्या यशस्वीतेसाठी महेशगिर बाबा यांच्या मार्गदर्शनात गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी आठवडाभर परिङ्म्रम घेतले. ५ ते १२ जुलै आषाढी सोहळा तर १२ ते १९ जुलै पर्यंत चाललेल्या संत ओंकारगीर बाबा पुण्यतिथी सोहळयाने गावामध्ये निर्माण झालेले वातावरण लगेचच सुरु होणार्या संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळयाने कायम राहणार असून पुढे सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमाची पर्वणी भाविकांना लाभणार आहे. दरम्यान मिरवणुक व महाप्रसाद वाटपाच्या वेळी पोलीस निरिक्षक जायभाये यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.