एप्रिल महिन्याच्या धान्य वितरणात बदल करण्यात आला आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या गव्हाचे प्रमाण ४० टक्के कमी करून, त्या ठिकाणी ३० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण करण्यात येईल. मका व ज्वारीचा विक्रीदर प्रतिकिलो १ रुपया आहे, तसेच गहू विक्रीचा दर प्रति किलो २ रुपये, तांदूळ प्रति किलो ३ रुपये याप्रमाणे राहील. शेतकरी लाभार्थ्यांच्या वितरणात कोणताही बदल झालेला नाही. बदललेल्या धान्य वितरणानुसार अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रति कार्ड ९ किलो गहू, ४.५ किलो मका, १.५ किलो ज्वारी, ५० किलो तांदूळ व १ किलो साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनांतर्गत प्रति व्यक्ती १.८ किलो गहू, ९०० ग्रॅम मका, ३०० ग्रॅम ज्वारी, २ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे, तसेच शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत प्रति व्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ वितरित केले जाणार आहेत.
राशन कार्डांवरून ४० टक्के गहू कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST